IPL मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू|Most Sixes by Batsman in IPL History in Marathi

 IPL अर्थात इंडियन प्रीमियर लीगची लोकप्रियता प्रचंड आहे. 2008 पासून सुरवात झाल्यानंतर 2020 पर्यंत IPL ची 13 सिझन पार पडली आहेत.प्रत्येक सिझन नंतर IPL च्या लोकप्रियतेमध्ये वाढच होत आहे.
याच IPL मधून अनेक खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळाले.IPL मुळे अनेक खेळाडूंना स्वतःची ओळख निर्माण करता आली.अनेक खेळाडूंनी IPL मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून टीम इंडिया मध्ये स्थान मिळवले आहे.याच IPL मध्ये अनेक विक्रम ही रचले गेले आहेत,यातले काही विक्रम भारतीय खेळाडूंच्या नावावर आहेत तर काही विक्रम परदेशी खेळाडूंच्या नावावर आहेत.

IPL मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या 5 खेळाडूंच्या यादीत 3 भारतीय खेळाडू आहेत.तर 2 परदेशी खेळाडू आहेत.


IPL मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज|Most Sixes by Batsman in IPL History in Marathi-


1)ख्रिस गेल-

आयपीएलमधील वैयक्तिक खेळाडूने केलेल्या सर्वाधिक षटकारांच्या विक्रमी यादीमध्ये ख्रिस गेलने पहिले स्थान कायम राखले आहे. या वेस्ट इंडीयन खेळाडूच्या आणि दुसर्‍या स्थानावरील खेळाडूमध्ये 114 षटकारांचा फरक आहे. ख्रिस गेलने आतापर्यंत 132 IPL T-20 सामन्यांमध्ये 349 षटकार  ठोकले आहेत.


2)ए. बी. डिविलीयर्स- 

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)  कडून खेळणारा हा खेळाडू सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.ए. बी. डिविलीयर्सने 169 मॅचेसमध्ये 235 षटकार ठोकले आहेत.


3)महेंद्रसिंग धोनी-

महेंद्रसिंग धोनीने या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे तसेच सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये महेंद्रसिंग धोनीने अव्वल स्थान मिळवले आहे.धोनीने 204 सामन्यांमध्ये 216 षटकार मारले आहेत.


4)रोहित शर्मा-

रोहित शर्माने या यादीत चौथे स्थान मिळवले आहे.त्याने IPL मध्ये एकूण 213 षटकार मारले आहेत,ही कामगिरी त्याने 200 मॅचेस मध्ये केली आहे.रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांमध्ये केवळ 3 षटकारांचे अंतर आहे.


5)विराट कोहली-


विराट कोहली सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.विराट कोहलीने आतापर्यंत 192 मॅचेसमध्ये 201 षटकार मारले आहेत.


तर हे आहेत IPL मधील सर्वाधिक षटकार मारणारे 5 खेळाडू.


अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आमचा ब्लॉग dailymarathi.in ला नक्की भेट द्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने