प्रेरणादायी मराठी बोधकथा। Life Changing Motivational Story in Marathi

 मित्रांनो आपल्या आयुष्यात अनेक असे प्रसंग घडतात ज्यामुळे आपल्याला असे वाटते की आपले पुढे काय होणार,आपण निराश होतो.अनेकदा आपल्या आजूबाजूला असे लोक असतात जे आपल्याला सतत नकारात्मक बोलत असतात,त्यामुळे आपले विचार तसेच नकारात्मक होतात.अनेकदा आपले जवळचे लोकच आपल्याला बोलत असतात त्यामुळे आपण निराश होतो.काहीजण अश्या बोलण्यामुळे स्वतःबद्दल न्यूनगंड बाळगतात, त्यामुळे स्वतःमध्ये जी काही क्षमता असते त्या क्षमतेचा आपण पुरेपूर वापरच करत नाही,त्यामुळे अनेक जण फक्त आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर न केल्यामुळे अपयशी ठरतात.

Life Changing Motivational Story in Marathi


मित्रांनो यशस्वी होण्यासाठी आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासोबतच स्वतःवर पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे.दुसऱ्याला काय वाटते यापेक्षा स्वतःला काय वाटते हे अतिशय महत्त्वाचे आहे.स्वतःला जे बरोबर वाटते ते करा, जीवनात नक्की यशस्वी व्हाल.तसेही कोणीतरी म्हटले आहेच की,"जोपर्यंत नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सर्व काही शक्य आहे."


मित्रांनो या वरील वाक्यावरच आधारित एक Motivational story in marathi म्हणचेच प्रेरणादायी मराठी कथा आपल्यासाठी घेऊन आलो आहे.तर मित्रांनो चला तर ही Inspirational story in Marathi पाहूया.


Life changing motivational story in marathi | प्रेरणादायी मराठी कथा-


एक गाव होते,तिथे अजय आणि विजय हे राहत होते, ते दोघेही एकमेकांचे जिवलग मित्र होते.यातील विजय हा शरीरयष्टीने धष्टपुष्ट होता तर अजय हा शरीरयष्टीने किरकोळ होता.अजय आणि विजय दोघेही अनेकदा सोबतच खेळत असत.असेच खेळत असताना ते खेळत खेळत गावापासून काहीसे दूर निघून गेले.खेळता खेळता विजय हा विहिरीत पडला,अजयला ही गोष्ट लगेच लक्षात आली.अजयने विजयला वाचवण्यासाठी लगेच विहिरीच्या दिशेने धाव घेतली.विहिरीजवळ पोहचल्यावर त्याच्या लक्षात आले की विहीर काहीशी खोल आहे.त्याने आजूबाजूला मदतीला कोणी मिळते का हे पाहिले आणि मदतीसाठी कोणी मिळते का यासाठी हाका मारल्या.परंतु दूर दूर पर्यंत कोणीच दिसत नव्हते.


अजयने पहिल्यांदा विजयला धीर दिला आणि विचार केला की मलाच विजयला वाचवले पाहिजे.त्याने आजूबाजुला मदतीसाठी काही मिळते का हे पहिले.तेव्हा त्याला एक दोरी मिळाली,त्याने ती दोरी आणली आणि विहिरी मध्ये टाकली.त्याने विजयला ती दोरी पकडायला सांगितली.विजयने ती दोरी पकडली,त्यानंतर अजयने पूर्ण ताकद लावली आणि विजयला त्या विहिरीमधून बाहेर काढले.बाहेर आल्यानंतर विजयने अजयचे आभार मानले.


    अजय आणि विजय त्यानंतर त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी निघाले.गावात पोहोचल्यानंतर त्यांनी गावकर्यांना सर्व हकिकत सांगितली.परंतु त्यांच्या सांगण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही,कारण अजय हा अंगाने किरकोळ होता आणि विजय अंगाने धष्टपुष्ट होता,त्यामुळे सर्वाना त्यांचे बोलणे खोटे वाटले,त्यामुळे ते निराश झाले.अजय आणि विजय गावकऱ्यांना हे सर्व सांगत असताना, जवळच एक वयोवृद्ध आजोबा त्यांचे बोलणे ऐकत होते, त्यांनी अजय आणि विजयला जवळ बोलवून घेतले आणि विचारले की,

अजय जेव्हा तू विजयला दोरी दिली आणि दोरीच्या साहाय्याने वर खेचले तेव्हा तुला कोणी तुझ्या जवळपास होते का? तेव्हा अजयने म्हटले ,कोणीही नव्हते.तेव्हा ते आजोबा म्हटले बरोबर, कारण जेव्हा तू तुझे काम करत होता,तेव्हा तुझ्या आजूबाजूला कोणीही नव्हते,जे तुला म्हणू शकत होते,की तू हे नाही करू शकत.कारण तेथे फक्त तू होता,आणि तुझे मन तुला सांगत होते की तू हे करू शकतो,You can do it in Marathi , त्यामुळेच तू हे करू शकला.


 मित्रांनो हे खरेच आहे कारण जोपर्यंत तुम्हाला वाटते की तुम्ही करू शकता,You can do it in marathi तो पर्यंत काहीही अशक्य नाही, परंतु जेव्हा तुम्ही मनातून हार मान्य करता, तेव्हा सोप्या गोष्टीही तुम्हाला अवघड वाटू लागतात.याशिवाय आपल्या आजूबाजूला अनेक नकारार्थी माणसे असतात,जे आपला आत्मविश्वास कमी करत असतात, त्यांच्या बोलण्यानेही आपण नकारार्थी विचार करून आपला आत्मविश्वास कमी करत असतो,त्यामुळे आपल्या मनात स्वतःबद्दलच न्यूनगंड निर्माण होतो आणि आपण स्वतःलाच कमी समजू लागतो.त्यामुळे मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवा नक्कीच यशस्वी व्हाल.जगात अशी खूप उदाहरणे आहेत जे एके काळी अयशस्वी होते,परंतु त्यांनी प्रयत्न नाही सोडले,स्वतःवर कायम विश्वास ठेवला आणि ते यशस्वी झाले.त्यामुळे कठीण काळात स्वतःला सांगत राहा,"शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही."


तर मित्रांनो आयुष्यात नेहमी सकारात्मक राहा,प्रत्येक गोष्टीला सकारात्मक दृष्टीने बघा,सकारात्मक विचार करा,नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा आणि प्रयत्न सोडू नका ,आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल.असेच Motivational stories in Marathi, Motivational Quotes in marathi, Inspirational Lines in marathi, Inspirational stories in marathi,Marathi motivational stories,Marathi inspirational katha, inspirational Quotes in marathi,Marathi motivational katha,Marathi motivational lines, Motivation in marathi मिळवण्यासाठी आपल्या ब्लॉगला नक्कीच भेट द्या.

धन्यवाद…!!!

Post a Comment

أحدث أقدم